अजितअनंतराव पवार (२२ जुलै, १९५९ - २८ जानेवारी, २०२६)[१] हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक राजकारणी होते. २ जुलै २०२३ पासून आपल्या मृत्यूपर्यंत ते उपमुख्यमंत्री म्हणून काम करत होते.[२] २०२२-२३ या काळात त्यांनी महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून काम केले. तसेच बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून काम केले.[३] त्यांनी १९९१ पासून बारामती विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले.[४][५] ते सर्वाधिक वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री राहिले असून, ते ६वेळा या पदाची शपथ घेतली होती[६].[७]
| अजित पवार | |
| कार्यकाळ २ जुलै, २०२३ – २८ जानेवारी, २०२६ | |
| राज्यपाल | • सी.पी. राधाकृष्णन • आचार्य देवव्रत |
|---|---|
| मुख्यमंत्री | देवेंद्र फडणवीस |
| मागील | एकनाथ शिंदे |
| जन्म | २२ जुलै, १९५९ देवळाली प्रवरा, राहुरी, अहिल्यानगर |
| मृत्यू | २८ जानेवारी, २०२६ (वय ६६) बारामती, महाराष्ट्र, भारत |
| राजकीय पक्ष | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष |
| मागील इतर राजकीय पक्ष | • रालोआ (२०२३-२०२६) • संपुआ(२००४-२०२२ ) |
| वडील | अनंतराव गोविंदराव पवार |
| पत्नी | सुनेत्रा पवार |
| अपत्ये | पार्थ, जय |
| धर्म | हिंदू |
| संकेतस्थळ | www |
| सर्वाधिक-काळ उपमुख्यमंत्रीपदी | |
२०१९ मध्ये, त्यांनी भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेताना त्यांनी दावा केला की, त्यांना राष्ट्रवादीच्या बहुसंख्य आमदारांचा पाठिंबा आहे. परंतु ३ दिवसात दोघांनी राजीनामा दिला. २०२३ मध्ये त्यांनी त्यांचे काका शरद पवार यांना सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, यामुळे राष्ट्रवादीमध्ये अभूतपूर्व फूट पडली. तसेच अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावर देखील हक्क सांगितला. पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह स्वतःकडे ठेवण्याची इच्छा व्यक्त केली आणि विद्यमान अध्यक्ष शरद पवार यांच्यापासून राष्ट्रवादी पक्ष स्वतःकडे घेण्याचे संकेत दिले.[८][९][१०]

0 comments:
Post a Comment