PHOTO

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.

This is default featured slide 6 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.

1

Featured Post

दिनविशेष

0 १   जानेवारी  ==  वर्षाचा   पहिला   दिवस ०३   जानेवारी  ==  बालिका   दिन ०९   जानेवारी  ==  जागतिक   अनिवासी   भारतीय   दिन १०   जानेवारी ...

Popular Posts

Friday, January 11, 2019

जिजाऊ जंयंती


जिजामाता, (राजमाता जिजाऊ) हयांचा जन्म जानेवारी १२ इ.स. १५९८ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे झाला.

राजमाता जिजाऊ ह्या हिंदवी साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री होत्या.

आज हे स्थळ केवळ ऐतिहासिक स्थळ नाही तर एक पर्यटन स्थळ म्हणून देखील ओळखल्या जाते.

जिजाऊ माँसाहेबांचा जन्म भुईकोट राजवाड्यामध्ये १२ जानेवारी १५९८ साली झाला. आकर्षक भव्य प्रवेशद्वार असणारा हा राजवाडा सिंदखेड राजा नगरीमध्ये मुंबई-नागपूर हायवेला लागुनच आहे. याच वस्तूसमोर नगर पालिका निर्मित एक बगिचा देखील आहे. येथे राजे लखुजीराव जाधवांचे समाधीस्थळ आहे. ही भव्य वस्तू भारतातील संपूर्ण हिंदुराज्यांच्या समाधीपेक्षा मोठी वस्तू आहे. ज्या ठिकाणी जिजाऊंनी रंग खेळला तो महाल म्हणजे रंगमहाल. याच महालात शहाजीराजे आणि जिजाऊंच्या विवाहाची बोलणी करण्यात आली होती.

येथे नीलकंठेश्वराचे प्राचीन मंदिर आहे, या मंदिरामध्ये संपूर्ण पाषाणातून साकारलेले हरीहाराचे सुंदर शिल्प आहे, तर राजे लखुजीराव जाधवांनी मंदिराचे पुर्नजीवन केल्याचा शिलालेख कोरलेला आहे. या मंदिरासमोरच चौकोनी आकारात तळापर्यंत उतरण्यासाठी पायऱ्यांची व्यवस्था असणारी एक भव्य बारव आहे. तर ८व्या ते १० व्या शतकातील अतिप्राचीन असे हेमाडपंथी रामेश्वर मंदिर आहे.

राजेराव जगदेवराव जाधवांच्या कार्यकाळात भव्य किल्यांच्या निर्मितीची सुरवात झाली होती त्याचचं एक सुंदर उदाहरण म्हणजे काळाकोठ. अतिभव्य आणि मजबूत अशा या काळाकोठच्या भिंती २० फुट रुंद आणि तेवढ्याच उंच आहेत. यासोबतच साकरवाडा नावाचा ४० फुट उंच भिंतीचा परकोट येथे बघायला मिळतो, त्या परकोटावर निगराणीसाठी अंतर्गत रस्ता, आतमध्ये विहीर, भुयारी तळघरे, भुयारी मार्ग आहेत. तर या वस्तूचे प्रवेशद्वार देखील अतिसुंदर आहे.

मोतीतलाव म्हणजे सिंचनासाठी पाणी सोडण्याची अति सुव्यवस्थीत आणि त्या काळातील जल अभियांत्रीकीचा अतिउत्कृष्ट नमुना. या तलावाच्या समोरील भाग एका किल्ल्याप्रमाणे बांधण्यात आला असून, विलोभनीय असा परिसर याला लाभला आहे. मोतीतलावाबरोबरच चांदणी तलाव हे देखील एक प्रेक्षणीय स्थळ आहे. तलावाच्या मधोमध तीन मजली इमारत बांधण्यात आली आहे. या परिसरात अतिशय रेखीव पद्धतीने बांधण्यात आलेली पुतळाबारव आहे. ही म्हणजे असंख्य मूर्ती व शिल्पांचा एकत्र वापर करून बनविलेली देखणी शिल्पकृती. तसेच येथे एक सजनाबाई विहीर आहे, त्या काळी या विहिरीतून गावामध्ये पाणी पुरवठा भुमिगत बंधिस्त नाल्यांच्या द्वारे केल्या जात होत्या, या विहरीत आतपर्यंत उतरण्यासाठी पायऱ्यांची सुविधा देखील आहे.


💐💐💐💐💐💐💐💐💐$

स्वामी विवेकानंद.

नरेंद्रनाथ दत्त म्हणजेच स्वामी विवेकानंद यांचा जन्म कलकत्ता येथे १२ जानेवारी १८६३ मध्ये झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त आणि आईचे नाव भुनेश्वरीदेवी असे होते. स्वामी विवेकानंदांचे आजोबा दुर्गाचरण दत्त हे "संस्कृत" व "परीक्षण' भाषेचे एक विद्वान होते.नरेंद्रनाथ यांच्‍यावर लहानपणापासूनच महाभारत, रामायण व भक्तिभावा चा प्रभाव होता, कारण त्यांचे आई त्यांना ह्या गोष्टी सांगत असे. स्वामी विवेकानंद यांना वाचनाची खूप आवड होती आणि ते शाळेत सुद्धा सर्वात हुशार विद्यार्थी होते. फक्त अभ्यासातच नाही तर ते खेळण्यात हि तितकेच तरबेज होते. शाळेमध्ये प्रत्येक गोष्टी मध्ये ते भाग घेत असे.

स्वामी विवेकानंद यांना वाचनाची खूप आवड होती त्यांनी रामायण, महाभारत, भगवत गीता, वेद आणि पुराण अशा धार्मिक पुस्तकांचे ज्ञान मिळवले होते. इतकेच नाही तर त्यांनी भारतीय गायन सुद्धा शिकले होते. स्वामी विवेकानंदांनी १८८४ ला आपले शिक्षण पूर्ण करून "आर्ट्स" चे डिग्री मिळाली होती त्यानंतर त्यांनी संस्कृत आणि बंगाली संस्कृतीचा अभ्यास केला होता.

रामकृष्ण परमहंस हे स्वामी विवेकानंदांचे गुरु होते. रामकृष्ण परमहंस यांनी स्वामी विवेकानंद ह्यांना घडवले होते आणि त्यांनीच त्यांना विवेकानंद हे नाव दिले होते. स्वामी विवेकानंद धार्मिक स्वभावाचे होते. त्यांना देशातील दारिद्र्य आणि अज्ञान पाहून खूप दुःख होत असे. भारतीय समाज सर्व समर्थ बनला पाहिजे असे त्यांना नेहमी वाटत असे.

स्वामी विवेकानंद ह्यांनी भारतीय संस्कृती आणि हिंदुत्वाचा प्रसार पूर्ण जगभर पसरवण्याचे काम केले होते. अमेरिके मध्ये शिकागो येथे १८९३ मध्ये सर्वधर्मपरिषद झाली होती. तिथे ते हिंदू धर्माचे प्रतिनिधी म्हणून गेले होते. तिथे स्वामी विवेकानंदांचे भाषण एकूण सर्व लोक मंत्रमुग्ध झाले होते. त्यांच्या ह्या भाषणामुळे हिंदुधर्माचा आणि संस्कृतीचा प्रचार पूर्ण जगाला झाला होता आणि त्याबरोबरच स्वामी विवेकानंद ही विश्व प्रसिद्ध झाले.

अमेरिके वरून परतल्यानंतर त्यांनी संपूर्ण भारत फिरण्याचा निर्णय घेतला आणि आपले विचार लोकांना सांगायला सुरु केले. त्यांनी आपल्या ज्ञानाने लोकांना जागृत केले.

असा हा महापुरुष १९०२ साली आपल्या देशाला सोडून गेला आणि स्वर्गवासी झाला. स्वामी विवेकानंद यांचे कन्याकुमारी येथे भव्य स्मारक बांधण्यात आले आहे. स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस म्हणजेच 12 जानेवारी ह्याला "नॅशनल युथ डे" या स्वरूपाने संपूर्ण भारतभर साजरा केले जाते.


Sunday, September 2, 2018

@ब्लॉग चे काम चालू आहे सहकार्य राहवे