Saturday, November 29, 2025
Thursday, August 28, 2025
Sunday, June 26, 2022
Monday, February 18, 2019
छत्रपती शिवाजीराजे जयंती
छत्रपती शिवाजीराजे भोसले (१९ फेब्रुवारी १६३० ते ३ एप्रिल १६८०) हे मराठा साम्राज्याचे संस्थापक होते.[ संदर्भ हवा ] भोसले कुळातील या राजाने विजापूरच्या आदिलशाहीविरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध संघर्ष करून मराठा स्वराज्य स्थापन केले.[ संदर्भ हवा ] रायगड ही राजधानी असलेले स्वतंत्र मराठा राज्य शिवाजी राजांनी उभे केले आणि इ.स. १६७४ मध्ये छत्रपती म्हणून राज्याभिषेक करवून घेतला.[ संदर्भ हवा ]
| छत्रपती शिवाजीराजे शहाजीराजे भोसले | ||
|---|---|---|
| छत्रपती | ||
| छत्रपती शिवाजी महाराज | ||
| मराठा साम्राज्य | ||
| अधिकारकाळ | जून ६, १६७४ ते एप्रिल ३, १६८० | |
| राज्याभिषेक | जून ६, १६७४ | |
| राज्यव्याप्ती | पश्चिम महाराष्ट्र, कोकण, सह्याद्री डोंगररांगांपासून नागपूरपर्यंत आणि उत्तर महाराष्ट्र, खानदेशापासून दक्षिण भारतात तंजावरपर्यंत | |
| राजधानी | रायगड किल्ला | |
| पूर्ण नाव | शिवाजीराजे शहाजीराजे भोसले | |
| जन्म | फेब्रुवारी १९, १६३० | |
| शिवनेरी किल्ला, पुणे | ||
| मृत्यू | एप्रिल ३, १६८० | |
| रायगड | ||
| उत्तराधिकारी | छत्रपती संभाजीराजे भोसले | |
| वडील | शहाजीराजे भोसले | |
| आई | जिजाबाई | |
| पत्नी | सईबाई, सोयराबाई, पुतळाबाई, काशीबाई, सकवारबाई लक्ष्मीबाई सगणाबाई गुणवंतीबाई | |
| राजघराणे | भोसले | |
| राजब्रीदवाक्य | 'प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।' | |
| चलन | होन, शिवराई, (सुवर्ण होन, रुप्य होन??) | |
शिस्तबद्ध लष्कर व सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले.[ संदर्भ हवा ] भूगोल, आश्चर्यजनक वेगवान हालचाली आणि बलाढ्य शत्रूंचे मनोधैर्य खच्ची करणारे नेमके हल्ले यांचा वापर करणारे गनिमी काव्याचे तंत्र त्यांनी यशस्वीपणे वापरले.[ संदर्भ हवा ] आपल्या वडिलांकडून मिळालेल्या २,००० सैनिकांच्या छोट्या तुकडीपासून एक लाख सैनिकांचे लष्कर छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केले. किनारी आणि अंतर्गत प्रदेशातील किल्ल्यांची डागडुजी करण्यासोबतच अनेक किल्लेही त्यांनी उभारले.[ संदर्भ हवा ] राज्यकारभारात मराठी भाषेचा वापर करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले.[ संदर्भ हवा ]
महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज हे शिवाजीराजा, शिवाजीराजे, शिवबा, शिवबाराजे, शिवराय अशा अनेक नावांनी ओळखले जातात.[ संदर्भ हवा ] शिवाजी महाराजांचा जन्मदिवस हा ‘शिवजयंती’ म्हणून साजरा होतो.[ संदर्भ हवा ] छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांचा संयुक्त उल्लेख 'शिवशंभू' असा होतो.
सर्वसाधारणपणे शिवाजी महाराजांचा जन्म (१६३०) ते औरंगजेबाचा मृत्यू (१७०७) ह्या ७७ वर्षांच्या काळास इतिहासकार ‘शिवकाल’ असे म्हणतात.[१]
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल पंडित नेहरू आपल्या डिस्कवरी ऑफ इंडिया (भारताचा शोध) या ग्रंथात म्हणतात : "छत्रपती शिवाजी प्रतिहल्ला करणाऱ्या हिंदू राष्ट्रवादाचे प्रतीक होते. जुन्या इतिहासातून त्यांनी प्रेरणा मिळविली. महाराज अत्यंत धैर्यशील आणि उत्कृष्ट नेतृत्वगुण असणारे नेते होते. त्यांनी स्वराज्यासाठी चिवटपणे लढणारा गट म्हणून मराठी जनांना एकत्र केले, त्यांच्यामागे राष्ट्रीयत्वाची पार्श्वभूमी उभी केली आणि या गटास अशी चेतना दिली की या गटाशी धडका घेत मुघल साम्राज्य अखेर मोडकळीस आले. छत्रपतींचा मृत्यू १६८० मध्ये झाला तरी त्यांच्यानंतर संपूर्ण भारतावर प्रभुत्व प्रस्थापित होईपर्यंत मराठ्यांचा राज्यविस्तार होतच राहिला."[ संदर्भ हवा ]
शिवरायांसी आठवावे|जीवित तृणवत मानावे| इहलोकी परलोकी उरावे|किर्तिरुपे||
'आरमार हे राज्याचे स्वतंत्र राज्यांगच आहे. ज्यास अश्वबल त्याची पृथ्वी प्रजा आहे. तद्वतच ज्याजवळ आरमार त्याचा समुद्र. याकरिता आरमार अवश्य मेव करावे.' असं आज्ञापत्रात म्हटलं आहे. त्याकाळातील आरमाराचे महत्त्व सांगणारे हे आज्ञापत्रातील वर्णन होय. जाणता राजा, निश्च्यायाचा महामेरू छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आरमाराची सुरूवात नक्की कधी व कशी केली, याविषयी मराठा इतिहासात थेट नोंद नाही. परंतु, बखरी आणि युरोपीय नोंदीमधून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष स्वरुपात माहिती समोर येते, असा संदर्भ 'मराठा आरमार एक अनोखे पर्व' या डॉ. सचिन पेंडसे यांच्या पुस्तकात सापडतो.
छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी आणि कौशल्याच्या बळावर समुद्र सुरक्षिततेचे महत्त्व ओळखून मराठा आरमार दलाची (इंडियन नेव्ही) स्थापना केली. आज भारतीय नाविक दल छत्रपती शिवाजी महाराजांना 'Father of Indian Navy' (भारतीय आरमाराचे जनक) मानते. शिवरायांनी त्याकाळी हिंदुस्थानातील पहिले जहाज निर्माण करुन सागरी सुरक्षेची मुहूर्तमेढ रोवली. खंबायतच्या आखातापासून त्रावणकोर, कोचीनपर्यंतची सागरी सत्ता काबीज करून मराठ्यांचे वर्चस्व स्थापित केले. 'ज्याचे आरमार त्याचा समुद्र' ही कृती लक्षात घेऊन समुद्रावर आपलं स्वत:चं वर्चस्व निर्माण करायचं असेल आणि समुद्र जिंकायचं असेल तर आरमाराची आवश्यकता असल्याचे छत्रपतींना वाटले. पोर्तुगीज, इंग्रज आणि सिद्दी यांच्या आक्रमणांपासून हिंदुस्थानला वाचवायचे असेल तर स्वतःचे आरमार हवे, हे शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेच्या वेळीच ओळखले होते.
किल्ले, घोडदळ, पायदळ, गडकोट, याबरोबरचं मराठा स्वराज्याच्या संरक्षणासाठी आरमाराची गरज निर्माण झाली होती. १६५९ ला महाराजांनी आरमाराची मुहुर्तवेढ रोवली असा उल्लेख सापडतो. इतिहासकार सुरेंद्रनाथ सेन म्हणतात, मराठ्यांकडे युध्दांची परंपरा असली तरीही समुद्र हा त्यांच्यासाठी एक नवीनच पैलू होता. भारताच्या इतिहासात शिवाजी हे कदाचित एकमेव राजे होते, ज्यांनी नौदलाची स्थापना राजकीय दृष्टीने केली. महाराजांनी केवळ साम्राज्याच्या संरक्षणासाठी आरमाराचा उपयोग केला नाही तर व्यापाऱ्याच्या दृष्टीनेदेखील खुबीने त्याचा वापर केला.
आरमार उभारण्यासाठी महत्त्वाची कारणे -
कोकण किनाऱ्याचे, सिद्दी आणि युरोपीय व्यापारी शक्तींपासून रक्षण करणे.
युरोपीय शक्तींना राजकीय हस्तक्षेपापासून दूर ठेवणे.
कोकणातील प्रजेचे सिद्दी आणि पोर्तुगीजांच्या हल्ल्यांपासून संरक्षण करणे.
बंदरे आणि त्यांमधून होणाऱ्या व्यापार आणि उत्पन्नाचे रक्षण करणे
व्यापारी जहाजांची सुरक्षा करणे
नाविक नाकेबंदीपासून कोकणाचे संरक्षण करणे.
आरमारी जहाजांचे प्रकार-
मराठ्यांच्या युध्दनौका
गलबत - साधारणपणे ७० टन क्षमतेचे असून वल्ह्यांच्या सहाय्याने हाकले दाई. यात २० माणसे बसतील, अशी सोय होती.
गुरब - १५० ते ३०० टन क्षमतेचे असे. गुरबाच्या वरची बाजू बांबूची बनलेली असे. पुढच्या भागात नाळ असे. या बांधणीमुळे प्रवासात ते मोठ्या प्रमाणात हेलकावे घेत असे. गुरबाच्या वरच्या बाजूला भागात नाळेवर ९ ते १९ पौंडाच्या दोन तोफा असत. या तोफा पुढच्या बाजूला डागल्या जात तर गुरबाच्या बाजूला ६ ते ९ पौंडाच्या तोफा असत.
पाल - मराठा आरमारातील सर्वात मोठी युद्दनौका होय. विजयदुर्गाच्या लढाईनंतर ७४ तोफा असलेले एक मोठे (पाल) इंग्रजांना सापडले होते. पाल हे दुमजली असे. वरच्या भागात एक आराम करण्यासाठी आणि निरीक्षणासाठी जागा असे.
व्यापारी जहाजे-
मचवा -
याचा उपयोग मुख्यत: मासेमारी आणि सामान वाहून नेण्यासाठी केला जात असे. मासेमारीसाठी वापरण्यात येणाऱ्या मचव्यास कोला किंवा कोळी मचवा असे म्हटले जाई. यात शिडांच्या उपयोगाबोरबर वल्ह्यांचाही वापर करण्यात येत असे. काही मोठ्या मचव्यांवर २-६ तोफा ठेवून त्यांचा आरमारात उपयोग केला जात असे. मचवा २ ते ३ टन क्षमतेचा असे आणि त्यात ५० माणसे मावत.
महागिरी - महागिरी २० ते ३० टन क्षमतेची असे. महागिरीचा वापर मंगलोरहून विटा आणि कौले आणण्यासाठी केला जात असे. महागिरीवर शीड आणि वल्ही याचा उपयोग केला जात असे.
पटीमार - पटेमारी, पटेमार
पटीमार हे मचव्यापेक्षा मोठे, अरूंद, देखणे हाज असे. पटेमार २५ ते १०० टन क्षमतेचे असे. पटेमार हे अतिशय वेगवान असून सामान वाहून नेण्याची क्षमता अधिक असे.
शिबाड-
शिबाड ही पटेमारची मोठी आवृत्ती होती. शिबाडाचे वेगळेपण त्याच्या चौकोनी आकाराची मागची बाजू यातून दिसे. पाल व्यतिरिक्त इतर भारतीय जहाजांची मागची बाजू निमुळती असे.
बटेला -
मचवा आणि पडावाची मोठी आवृत्ती म्हणजे बटेला. बटेलाचा उपयोग मलबार, कोकण, गुजरातमधील वाहतुकीसाठी केला जात असे.
जहाज बांधणी -
जहाज बांधणीसाठी इमारती लाकडाची उपयोग करण्यात येत असे. जहाजाचे पठान (keel), बाहेरील फळ्या आणि समुद्राच्या पाण्याशी संबंध असलेले भाग हे लाकडांपासून बनवलेले असतं. तर जहाजाच्या आतील भागासाठी उंडी, आंबा, फणस या झाडांच्या लाकडाचा उपयोग केला जात असे. डोलकाठ्यांसाठी पुन्नी आणि आइन ही दोन प्रकारची लाकडे उपयोगात आणली जात असे. मराठ्यांच्या काळात उत्तर कोकणात कल्याण, भिवंडी, वसई, ठाणे, कुलाबा या जिल्ह्यांच्या किनाऱ्यावर नागाव आणि बाणकोट, विजयदुर्ग येथे जहाजबांधणी होत असे.
युरोपीय जहाजे -गॅलिओत, गल्लीयोत, गॅलीओते, कॅरक, गॅलियन, कॅरवेल, चौकौनी शिडाचे कॅरवेल, फ्रिगेट, Ship of the line, मॅन ऑफ वॉर, बॉम्ब वेसल (बॉम्ब केच), स्लूप, इस्ट इंडिया मेन, छत्रपती महाराजांनी खुबीने आरमारात व्यापारी दृष्टीकोन आणला. समुद्री व्यापार वाढवण्यासाठी महाराजांनी केलेले प्रयत्न इंग्रज, पोर्तुगीज, डच इ. च्या विविध नोंदीतून हे स्पष्ट होतात. १२ मार्च, १६६५ मधील एका नोंदीनुसार, महाराजांच्या ताब्यातील ८-९ बंदरामधून दरवर्षी २-३ जहाजे पर्शिया, बसरा आणि मोख्याला व्यापारासाठी पाठवत असल्याची नोंद आहे. या काळात कोकणातून तांदूळ आणि मिठाचा व्यापार, दाभोळ, कल्याण, भिवंडी, वेंगुर्ला, पेण आणि राजापूर या बंदरातून होत असे.
(संदर्भ आणि फोटो - मराठा आरमार एक अनोखे पर्व - डॉ. सचिन पेंडसे)
जलदुर्ग -
कोकण किनारपट्टीच्या सुरक्षिततेबरोबरच, संदेशवहन, दळणवळण, व्यापार ही आरमार आणि जलदुर्ग उभारणीची काही प्रमुख उद्दीष्टे आहेत. आरमाराच्या हालचाली, संरक्षण यातून जलदुर्गाचे महत्त्व अनन्यसाधारण होते. सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, खांदेरी-उंदेरी विजयदुर्ग, सुवर्णदुर्ण असे कित्येक जलदुर्ग आणि आरमार यांची जोड संरक्षण आणि व्यापाराला होती.
आरमारी तोफा -
आपल्या आरमारांचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी आरमारी तोफांच्या मारक शक्तीचा पुरेपूर उपयोग करून आरमारी तोफखाना ही नवी संकल्पना पुढे आली. आरमारी तोफांचा उपयोग पहिल्यांदा १५ व्या शतकात करण्यात आला आणि या तोफांमुळे काही अंतरावरूनच शत्रूच्या जहाजांना बुडवता येते, हे आढळल्यानंतर तोफा या जहाजावरील मुख्य अस्त्र म्हणून प्रस्थापित झाल्या.
त्याहूनि करावे विशेष । तरीच म्हणावे पुरुष ॥
या उपरी विशेष । काय लिहावें ॥१९॥
या पंक्तीप्रमाणे छत्रपती महाराजांची स्वराज्य संरक्षण, अर्थव्यवस्थेची नीतीबाबतचा दूरदृष्टीकोन किती अफाट होता, हे दिसून येते. महाराजांनी स्थापलेल्या या आरमाराने हिंदुस्थानच्या इतिहासातील एका नवीन पर्वाची सुरूवात झाली, असं म्हणायला हरकत नाही.
संकलन - स्वालिया शिकलगार, पुढारी ऑनलाईन डेस्क




















