डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन ❒
━═•●◆●★★●◆●•═━
*२ रे भारतीय राष्ट्रपती*
~ कार्यकाळ ~
( १३ मे १९६२ – १३ मे १९६७ )
*भारताचे दुसरे राष्ट्रपती, तत्त्वज्ञ,* त्यांच्या गौरवार्थ त्यांचा जन्मदिन हा ’शिक्षक दिन’ म्हणून ओळखला जातो.
*_"यांच्या जयंती निमित्त_*
*_विनम्र अभिवादन"_*
🙏🌸🌷🌹🌷🌸🙏
*दिव्यत्वाची जेथ प्रचीती*
*तेथे कर माझे जुळती ..!!*
🙏💐🌹🙏🌹💐🙏
*●जन्म :~ ५ सप्टेंबर १८८८*
तिरुत्तनी, तमिळनाडू, दक्षिण भारत
●मृत्यू :~ १७ एप्रिल १९७५
*◆ सर्वपल्ली राधाकृष्णन ◆*
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा ५ सप्टेंबर रोजी जन्मदिन‘शिक्षक दिन’म्हणून साजरा करण्यात येतो.‘शिक्षक’हा भावी पिढीचा शिल्पकार असून त्यांच्याकडूनच आपल्याला ज्ञान व जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळत असते. आपल्या गुरू, शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस..
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे शिक्षकांप्रती असलेले प्रेम व आदर पाहून भारत सरकारने त्यांचा जन्मदिन हा ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा करण्याचा संकल्प केला. ती परंपरा अजूनही सुरू आहे व भविष्यातही सुरूच राहील. १९६२ मध्ये डॉ. राधाकृष्णन यांनी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली तेव्हा त्यांचा जन्मदिवस हा शिक्षकांचा गौरव दिन म्हणून साजरा करण्याची इच्छा प्रकट केली होती. देशातील शिक्षकांचा गौरव हाच आपला गौरव असल्याचे त्यांनी सांगितले होते.
हे भारताचे माजी राष्ट्रपती व नामांकित शिक्षणतज्ज्ञ हाते. डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती होते. त्यांच्या कार्यकाळ (इ.स. १९५२ - इ.स. १९६२) असा आहे. त्यांचा जन्म दक्षिण भारतात तिरुत्तनी या ठिकाणी झाला. हे गाव चेन्नई (मद्रास) शहरापासून ईशान्येला ६४ किमी अंतरावर आहे.
पाश्चात्त्य जगताला भारतीय तत्वज्ञानाचा तात्त्विक परिचय करून देणारा भारतावरील ब्रिटिश सत्ताकाळातला महत्वाचा विचारवंत म्हणून राधाकृष्णन यांना ओळखले जाते. भारतीय तत्त्वज्ञानाचे भाष्यकार म्हणून ते ऑक्सफर्डमध्ये नावाजले गेले. त्यांच्या कार्याचे महत्त्व जाणून ऑक्सफर्ड विद्यापीठानेत्यांच्या नावाने 'राधाकृष्णन मेमोरियल बिक्वेस्ट' हा पुरस्कार ठेवला आहे.
व्यक्ती आणि समाजाच्या विकासात शिक्षणाचा वाटा मोलाचा आहे. जिथे शिक्षण आहे तिथेच विकास आहे, म्हणूनच शिक्षणातून व्यक्तीची जडणघडण करणाऱ्या शिक्षकाचा आदर करण्याचा हा दिवस असतो. गुरू-शिष्य संबंधांमधील पावित्र्य कायम ठेवण्यासाठी व डॉ. राधाकृष्णन् यांच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी शिक्षक दिन साजरा केला जातो.
▂


%20(5).jpeg)

0 comments:
Post a Comment